पुढील वर्षी या महिन्यात लाँच होणार मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार

Thote Shubham

देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या ऑटो एक्स्पोमध्ये आपली शानदार कार लाँच करणार आहे. या ऑटो एक्स्पोमध्ये कंपनी आपली पहिली इलेक्ट्रिक कार लाँच करू शकते. मारुतीने Futuro-E नावाने ट्रेडमार्क रजिस्टर केला आहे. कंपनी मागील 1 वर्षापासून इलेक्ट्रिक कारची टेस्टिंग करत आहे. कंपनी या कारला 150 ते 200 किमी रेंजमध्ये लाँच करू शकते. जी एका शहरात फिरण्यासाठी पर्याप्त आहे.

 

या कारमध्ये मारूती सुझुकी फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी देऊ शकते. मारुतीच्या आधी टाटा मोटर्स, महिंद्रा, ह्युंडाई सारख्या कंपन्यांनी इलेक्ट्रिक कार्स बाजारात लाँच केलेल्या आहेत. त्यामुळे केवळ मारुतीच अशी कंपनी आहे, जिने अद्याप इलेक्ट्रिक कार लाँच केलेली नाही. मारुतीच्या Futuro-E इलेक्ट्रिक कारची एक्स शोरूम किंमत 7 ते 10 लाखांदरम्यान असण्याची शक्यता आहे. तर या कारला टक्कर देणारी टाटा टिगोर ईव्हीची किंमत 9.44 लाख ते 9.75 लाख रुपये आहे.

 

Futuro-E इलेक्ट्रिक कारमध्ये कन्वेंशनल फ्रंट ग्रिलसोबतच प्रोजेक्टर हेडलँप्म्प, एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स आणि एलईडी टेललाईट्स मिळेल. यामध्ये एलॉय व्हिल देखील मिळू शकतात. या कारची लांबी 655 एमएम, रूंदी 1620 एमएम आणि उंची 2435 एमएम असू शकते. या व्हिलबेस 2435 एमएम असू शकतो.

 

रिपोर्टनुसार, या कारमध्ये टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम मिळू शकते, जे अपल कारप्ले आणि अँड्राईड ऑटो सपोर्ट असेल. या कारला रेग्युलर 15A सॉकेटसोबत DC फास्ट चार्जरद्वारे देखील चार्ज करता येईल. याची रेंज 130 किमीच्या जवळपास असण्याची शक्यता आहे.

Find Out More:

Related Articles: