टाटाची बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक कार ‘टाटा नेक्सॉन ईव्ही’ लाँच

Thote Shubham

टाटा मोटर्सने आपली पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही टाटा नेक्सॉन ईव्ही लाँच केली आहे. या आधी टाटाने डिसेंबर महिन्यात अल्ट्रोज देखील लाँच केली होती. या कारचे वैशिष्टय म्हणजे सिंगल चार्जमध्ये ही कार 300 किमीपर्यंतचा प्रवास करू शकते. नेक्सॉन इलेक्ट्रिकमध्ये 30.2 kWh बॅटरी पॅक देण्यात आलेला आहे.

 

जो 129 एचपी पॉवर आणि 254 एनएम टॉर्क जनरेट करतो. यामध्ये लिथियम आयन बॅटरी पॅक आहे. या बॅटरी पॅकला आयपी67 रेटिंग मिळाली आहे. यावर पाणी व धुळीचा परिणाम होत नाही. बॅटरी पॅकमध्ये लिक्विड कूलिंग फीचर देखील आहे, जे गरम तापमानात चांगला परफॉर्मेंस देते.

 

टाटाची ही एसयूव्ही केवळ 4.6 सेंकदात 0 ते 60 किमीचा वेग पकडते. तर ताशी 0 ते 100 किमीचा वेग पकडण्यास 10 सेंकद लागतात. ही कार ड्राईव्ह आणि स्पोर्ट या दोन मोडमध्ये उपलब्ध आहे. टाटाचा दावा आहे की, स्पोर्ट्स मोडमध्ये 6 टक्के अधिक टॉर्क मिळेल. कंपनीने या कारमध्ये जिपट्रॉन ईव्ही टेक्नोलॉजी दिली आहे. जेणेकरून लोकांना ड्रायव्हिंग करताना परफॉर्मेंस, कंफर्ट आणि अफोर्डेबिलिटिचा अनुभव घेता येईल.

 

कंपनी या कारवर 8 वर्ष अथवा 1.6 लाख किमीची वॉरंटी देत आहे. यामध्ये पर्मेनेंट मॅग्नेट एसी मोटर मिळेल. यामुळे टॉर्क चांगला मिळेल व बॅटरी ड्रेन देखील होणार नाही. या एसयूव्ही 15A पॉवर आउटलेटने देखील चार्ज करता येईल. एक तासात ही कार 80 टक्के चार्ज होईल. तर स्टँडर्ड चार्जरवर फूल चार्ज होण्यास 7 ते 8 तास लागतील.

टाटा नेक्सॉन ईव्हीचा ग्राउंड क्लिरेंस 205 एमएम असेल. यामध्ये डायनॅमिक कॅपिबिलिटी फीचर मिळेल. यामध्ये हिल एसेंट आणि डिसेंट देखील मिळेल. रिजेनरेटिव्ह ब्रेक्रिंग फीचर देण्यात आलेले आहे.

 

या कारणध्ये सनरूफ, टचस्क्रीन इंफोटेनममेंट सिस्टम (अॅपल कारप्ले, अँड्रॉईड ऑटो सपोर्ट), ऑटोमेटिक क्लायमेंट कंट्रोल, ड्युअल एयरबॅग्स, ISOFIX चाइल्ड सीट, एबीएससोबत ईबीडी सारखे स्टँडर्ड फीचर्स मिळतील. यामध्ये रिमोट कनेक्टिव्हिटी फिचर मिळेल. याचे इंस्ट्रुमेंट कंट्रोल 7 इंच टीएफटी  असेल. या कारची एक्स शोरूम किंमत 15 ते 17 लाख रुपयांदरम्यान असेल. इच्छुक ग्राहक केवळ 21 हजारांमध्ये https://nexonev.tatamotors.com/ वर बुकिंग करू शकतात.

टाटा मोटर्सने चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चरवर देखील भरपूर काम केले आहे. सध्या 13 शहरांमध्ये 85 चार्जर असून, कंपनी लवकरच याची संख्या 300 करणार आहे. या शहरांमध्ये मुंबई, दिल्ली, पुणे, बंगळुरू आणि हैद्राबादचा समावेश आहे.

 

Find Out More:

Related Articles: