केटीएमने सादर केली तुफानी रेसिंग कार
ऑस्ट्रेयाची मोटारसायकल कंपनी केटीएम आपल्या हटके आणि वेगवान बाईकसाठी जगभरात ओळखली जाते. मात्र कंपनी आता स्पोर्ट्स कारची देखील निर्मिती करताना दिसत आहे. कंपनीने एक दशकांपुर्वी एक्स-बो (X-Bow) ही रेसिंग कार सादर केली होता. मात्र कंपनीने याच कारचे नवीन व्हर्जन केटीएम एक्स-बो जीटीएक्स सादर केले आहे. आधीच्या मॉडेलच्या तुलनेत या कारमध्ये अधिक पॉवरफुल इंजिन आहे.
नवीन केटीएम एक्स-बो जीटीएक्समध्ये ऑडी टीटीआरएस 2.5 लीटर 5-सिलेंडर इंजिन देण्यात आले आहे. जे तब्बल 600 एचपी पॉवर जनरेट करते. या कारचे वजन जवळपास 997 किलो आहे. याशिवाय कंपनीने दावा केला आहे की, होमोलोगॅटेड जीटी केजसोबत होमोलोगॅटेड मोनोकोक्यू एकत्र देणारी केटीएम पहिली कंपनी आहे.
कंपनीने आधीचे मॉडेल एक्स-बोच्या 1300 यूनिटचे मॅनिफॅक्चरिंग केले होते व या सर्व युनिट्सची विक्री झाली होती. आता कंपनीनुसार, या वर्षी केटीएम एक्स-बो जीटीएकसच्या केवळ 20 यूनिटचे मॅनिफॅक्चरिंग केले जाणार आहे. याशिवाय ही कार एसआरओ जीटी2 रेसिंग इव्हेंटमध्ये देखील भाग घेण्याची शक्यता आहे.