ऑटो क्षेत्रात सतत काही तरी नवीन येत असते. दिल्लीमधील टू व्हीलर ऑटो सेगमेंटमध्ये अशीच एक शानदार बाईक लवकरच दाखल होत असून या बाईकला चार चाके आहेत. लाझारेथ कंपनी चार चाकी बाईकवर काम करत असल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले होते. कंपनीची चारचाकी शानदार बाईक लवकरच बाजारात येत आहे. कंपनी वेबसाईटवर या संदर्भात माहिती दिली गेली आहे.
लाझारेथ कंपनीच्या या वेबसाईटवर एकापेक्षा एक वरचढ बाईक्सची माहिती दिली गेली असून त्यात या बाईकचाही समावेश आहे. एलएम ४१० या नावाच्या या बाईकला यामाहाचे आर १ इंजिन दिले गेले आहे. या बाईकचे सर्वात मोठे वैशिष्ट म्हणजे ती स्टँड शिवाय सरळ उभी राहते. तिला दिल्या गेलेल्या वाईड टायर्समुळे ती लोकप्रिय ठरेल असा दावा केला जात आहे.
या बाईकची किंमत १ लाख युरो म्हणजे साधारण ७७.३९ लाख रुपये आहे. अश्याच पद्धतीच्या या पूर्वीच्या मॉडेलला कंपनीने मोठे ४७० बीएचपीवाले मासरेट्टी व्ही ८ कार इंजिन दिले होते. ती २०१६ च्या जिनेव्हा शो मध्ये सादर केली गेली होती.