ओला, उबेरने देशाच्या साऱ्याच अर्थव्यवस्थेची वाट लावली - निर्मला सीतारामन

frame ओला, उबेरने देशाच्या साऱ्याच अर्थव्यवस्थेची वाट लावली - निर्मला सीतारामन

Thote Shubham

ओला आणि उबेर मुळे वाहन उद्योगात मंदी आल्याचे मासलेवाईक विधान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे, त्यावर देशात तीव्र प्रतिक्रीया उमटत आहेत. कॉंग्रेसनेही त्यांच्या या वक्तव्याची खिल्ली उडवताना म्हटले आहे की देशाच्या साऱ्याच अर्थव्यवस्थेची वाट ओला,उबेरने लावली आहे.

देशात जे काही चांगले झाले आहे ते आम्ही घडवले आहे आणि जे काही वाईट झाले आहे त्याला ओला उबेर जबाबदार आहे अशा शब्दात कॉंग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांनी त्यांच्यावर ट्विटरवर निशाणा साधला आहे.

आज देशात युवकांना रोजगार मिळत नाहीत याच्याबद्दलही तुम्ही विरोधकांनाच जबाबदार धरणार काय असा सवाल करून त्यांनी मोदींचे पाच ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचा स्वप्न कसे साध्य होणार असा सवालही त्यांनी केला आहे.

मोदी सरकारच्या पहिल्या शंभर दिवसांच्या काळात शेअर बाजारातील गुंतवणुकदारांचे तब्बल 12 लाख 50 हजार कोटी रूपये बुडाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. संपत्ती निर्मीत करणाऱ्यांना संरक्षण देण्याची ग्वाही देणाऱ्या मोदी सरकारने आपल्या चुकीच्या धोरणांमुळे साडे बारा लाख कोटी रूपयांना खड्ड्यात घातले आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

Find Out More:

Related Articles:

Unable to Load More