मर्सिडीजचा सर्वात मोठा ‘रिकॉल’, परत मागवल्या 7.4 लाख कार

Thote Shubham

नवी दिल्ली – आपल्या मर्सिडीज-बेन्झ प्रकारातील गाड्या जर्मन ऑटोमोबाइल निर्माता कंपनी Daimler AG ने परत मागवल्या आहेत. मर्सिडीज-बेन्झची Daimler AG ही पॅरंट कंपनी असून सुमारे 7 लाख 44 हजार गाड्यांचे कंपनीने रिकॉल केले आहे. या कार ग्लास पॅनल आणि स्लायडिंग रूम फ्रेममध्ये तांत्रिक दोष असल्याने परत मागवल्याचे, कारण कंपनीने दिले आहे.

 

कार देण्यात आलेले सनरुफ ग्लास पॅनल आणि स्लायडिंग रूम फ्रेममधील तांत्रिक दोषामुळे डिटॅच होऊ शकते. असे झाल्यास प्रवास करणाऱ्या व्यक्तींना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कंपनीने याची गंभीर दखल घेत या कार परत मागवल्या आहेत. कंपनीने 2001 ते 2011 या कालावधीत तयार झालेल्या कार ग्राहकांकडून परत मागवल्या असून काही सी-क्लास, सीएलके-क्लास, सीएलएस क्लास आणि ई-क्लास या प्रकारातील कारचाही यामध्ये समावेश आहे. कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये गाडी आणल्यानंतर शहानिशा करुन गरज भासल्यास दोष दूर करण्यात येईल, असे कंपनीच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले.

 

Find Out More:

Related Articles: