या आहेत टॉप 5 स्टायलिश इलेक्ट्रिक एसयुव्ही
सध्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. पेट्रोल-डिझेलपासून होणारे प्रदूषण लक्षात घेऊन आता कंपन्या देखील इलेक्ट्रिक कार्स बाजारात आणत आहेत. भविष्यात इलेक्ट्रिक कार्सचा वापर मोठ्या प्रमाणात असेल हे स्पष्ट झाले आहे. कंपन्या देखील इलेक्ट्रिक गाड्यांवर ऑफर देत आहेत. जगभरात देखील इलेक्ट्रिक गाड्यांच्या विक्रीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. जर तुम्ही इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी अशाच काही खास इलेक्ट्रिक एसयुव्ही कारची माहिती घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया.
1. एमजी झेडएस (MG ZS)
या कारची किंमत 18.40 लाख रूपये आहे. ही कंपनीची पहिली संपुर्ण इलेक्ट्रिक कार आहे. कारमध्ये 44.5kWh ची बँटरी असून, कारची रेंज 230 किमी आहे.
2. ह्युंदाई कोना ईवी
या कारची किंमत 23.71 लाख रूपये आहे. कारमध्ये 39.2kWh ची बँटरी असून, कारची रेंज 452 किमी आहे.
3. ऑडी ई-ट्रॉन
ऑडी ई-ट्रॉनची किंमत 53 लाख रूपये आहे. कारमध्ये क्यू5 प्रमाणेच स्टाइलिंग देण्यात आली आहे. तसेच कारमध्ये दोन इलेक्ट्रिक मीटर देण्यात आले आहेत. खास गोष्ट म्हणजे कार केवळ 40 मिनिटात पुर्ण चार्ज होऊ शकते.
4. मर्सिडीज बेंज EQC
या कारची किंमत 57 लाख रूपये आहे. कारची रेंज 420 किमी असून, केवळ 6 सेंकदात कार 0 ते 100 किमीचा स्पीड पकडू शकते.
5. जग्वॉर आय-स्पेस
या कारची किंमत 54 लाख रूपये असून, ही कंपनीची पहिली इलेक्ट्रिक कार आहे. केवळ 4.8 सेंकदात कार 0 ते 100 किमीचा स्पीड पकडू शकते. कारची रेंज 470 किमी आहे.