भारतीय क्रिकेट संघावर दहशतवादी हल्ल्याचे सावट

Thote Shubham Laxman

भारतीय क्रिकेट संघावर दहशतवादी हल्ला होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. भारतीय संघाने ट्‌वेंटी आणि वन डे मालिका खिशात घातली आहे. भारतीय संघ आता कसोटी मालिकेच्या तयारीसाठी लागला आहे. पण, संघावर दहशतवादी हल्ल्याचे सावट असल्याचा दावा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केला आहे. त्यामुळे भारतीय संघाच्य सुरक्षेत वाढ करण्यात आली असल्याचे बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे.

पाकिस्तानच्या जिओ वृत्तवाहिनीने याविषयी माहिती दिली आहे. भारतीय संघावरील दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तान बोर्डला तसा मेल आला आहे आणि त्यांनी याची कल्पना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला दिली आहे. मात्र आयसीसी आणि बीसीसीआय यांच्याकडून अद्याप या वृत्ताला दुजोरा देण्यात आला नाही. तर भारतीय संघाच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेतली जात असल्याचे बीसीसीआयकडून सांगण्यात आले आहे. जम्मू काश्‍मीरविषयीचे कलम 370 रद्द केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावपुर्ण वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभुमीवर दहशतवाद्यांनी भारतीस संघाला लक्ष्य केल्याची सध्या चर्चा आहे.

Find Out More:

Related Articles: