टीम इंडियाकडून हरमनप्रीत कौरने ‘ती’ खास शंभरी गाठलीच!!

Thote Shubham

भारतीय महिला टी20संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ही शुक्रवारी (4 ऑक्टोबर) आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 100 सामने खेळणारी पहिली भारतीय क्रिकेटपटू ठरली आहे. शुक्रवारी सुरतमध्ये भारतीय महिला विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघात 6 वा टी20 सामना पार पडला. हा सामना हरमनप्रीतचा 100 वा आंतरराष्ट्रीय टी20 सामना होता.

विशेष म्हणजे आत्तापर्यंत हरमनप्रीत व्यतिरिक्त भारताच्या कोणत्याही पुरुष किंवा महिला क्रिकेटपटूने 100 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळलेले नाही. भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत हरमनप्रीत नंतर एमएस धोनी आणि रोहित शर्मा आहेत. या दोघांनीही प्रत्येकी 98 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत.

आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सध्या सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम सध्या न्यूझीलंडची महिला क्रिकेटपटू सूझी बेट्स, ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू एलिस पेरी आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या नावावर संयुक्तरित्या आहे. या तिघांनीही प्रत्येकी 111 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत.

विशेष म्हणजे पुरुष क्रिकेटपटूंमध्ये आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 100 किंवा त्यापेक्षा अधिक सामने खेळणारा शोएब मलिक एकमेक क्रिकेटपटू आहे. तर महिला क्रिकेटपटूंमध्ये 100 किंवा त्यापेक्षा अधिक टी20 सामने 10 क्रिकेटपटूंनी खेळले आहेत.


Find Out More:

Related Articles: