रहाणे आता नाईटवॉचमनची भूमिका निभावण्यासाठी तयार रहा, मास्टर-ब्लास्टरने दिला सल्ला

Thote Shubham

भारताच्या कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला शनिवारी(5 ऑक्टोबर) कन्यारत्न प्राप्त झाले. पण रहाणे त्याच्या मुलीच्या जन्माच्यावेळी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील पहिल्या कसोटी सामन्यात व्यस्त होता.

त्यामुळे त्याला त्याच्या पत्नीकडे आणि नवजात मुलीकडे जाता आले नव्हते. पण हा सामना रविवारी(6 ऑक्टोबर) संपला. या सामन्यात भारताने 203 धावांनी विजय मिळवला.

या सामन्यानंतर रहाणे त्याच्या मुलीला आणि पत्नीला भेटला. त्याने सोशल मीडियावर पत्नी राधिका आणि मुलीबरोबरचा फोटो पोस्ट केला आहे.

रहाणेच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देताना सचिन तेंडूलकरने रहाणे आणि त्याची पत्नी राधिकाला हटके शुभेच्छा दिल्या आहे. सचिनने ट्विट केले आहे की ‘राधिका आणि अजिंक्य तूम्हाला खूप शुभेच्छा. पहिल्यांदा पालक बनण्याचा आनंद खूप मोठा आहे. त्याची मजा घ्या. नाईट वॉचमनच्या भूमिकेत काम करायला तयार रहा.’

रहाणेने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात 15 आणि दुसऱ्या डावात आक्रमक खेळ करताना 17 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 27 धावांची तुफानी खेळी केली होती.

रहाणे आता त्याच्या मुलीला भेटल्यानंतर पुन्हा 10 ऑक्टोबरपासून पुण्यात सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघातील दुसऱ्या कसोटी सामन्याआधी भारतीय संघात सामील होण्याची शक्यता आहे.


Find Out More:

Related Articles: