रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, मिळणार 60 हजारांपेक्षा अधिक पगार
10वी आणि 12वी पास असणाऱ्यांसाठी रेल्वेत नोकरीची खास संधी आहे. रेल्वेने अपरेंटिस पदासाठी अर्ज मागवले आहेत. पश्चिम रेल्वने 3,553 पदांसाठी अर्ज मागवले असून, इच्छूक उमेदवार 6 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.
महत्त्वाची तारीख –
rrc-wr.com या वेबसाईटवर इच्छूक उमेदवार 7 जानेवारी ते 6 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता –
उमेदवार 10 आणि 12 मध्ये 50 टक्के गुणांसह पास असणे आवश्यक आहे. याशिवाय त्याच्याकडे एनसीव्हीटी अथवा एससीव्हीटीमधून आयटीआय प्रमाणपत्र मिळवलेले असणे आवश्यक आहे.
वय –
उमेदवारांचे किमान वय 15 वर्ष आणि कमाल वय 24 वर्ष असणे आवश्यक आहे.
मेरिट पद्धतीने उमेदवारांची निवड केली जाईल. 13 फेब्रुवारीला मेरिट यादी जाहीर करण्यात येईल व 28 फेब्रुवारीला कागदपत्रे तपासणी होईल. निवड केलेल्या उमेदवारांचे 1 एप्रिल 2020 पासून प्रशिक्षण सुरू होईल.
पगार –
निवड झालेल्या उमेदवारांना 18 हजार ते 63,200 रुपयांपर्यंत पगार मिळेल.