जुन्नर तालुक्यातील आरोग्य सेवा व्हेंटिलेटरवर
जुन्नर तालक्यातील ओतूर या ठिकाणच बीव्हीजी ग्रुपची ऍम्ब्युलन्स ही काही दिवसांपासून बंद आहे. त्यातच आळेफाटा या ठिकाणावरून ऍम्ब्युलन्स मागवण्यात आली. आज (दि.16) रोजी संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास साप चावलेल्या पेशंटसाठी ओतुर शासकीय रुग्णालयातून ऍम्ब्युलन्स घेऊन जात असताना ओतुर शासकीय रुग्णालयाच्या जवळच ऍम्ब्युलन्स मधून धूर निघू लागला.
दरम्यान, ड्रायव्हरने प्रसंगावधान दाखवून स्थानिक तरुणांच्या मदतीने ऍम्ब्युलन्स वर पाणी टाकून धूर विझवण्यात आली. गेली पंधरा दिवस ओतुर या ठिकाणी असलेली ऍम्ब्युलन्स नादुरुस्त असतानाही त्याठिकाणी बीव्हीजी ग्रुपने त्याठिकाणी दुसऱ्या ऍम्ब्युलन्स व्यवस्था केलेली नाही.
त्यामुळे ओतुर परिसरातील रुग्णांवर खाजगी ऍम्ब्युलन्स कडे धाव घेण्याची गरज भासत आहे. तरी आरोग्य विभागाने याठिकाणी दुसरी ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून द्यावी आणि रुग्णांची होणारी हेळसांड थांबवावी.