भारतात कोरोनाचा कहर, रुग्णांची संख्या 81 वर पोहोचली

Thote Shubham

नवी दिल्ली : जगभरात हौदोस घालणारा कोरोना व्हायरस भारतात येऊन ठेपला आहे. भारतात आणखी कोरोनाची 5 प्रकरणे समोर आली आहे. आतापर्यंत भारतात 81 जणांचा कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. भारतात कोरोना व्हायरस बाधित रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होतांना दिसत आहे.   

 

कोरोनाबाबत सुरक्षितता बाळगता यावी म्हणून केंद्र सरकारने राज्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. दिल्लीत शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तर आयपीएल स्पर्धा सुद्धा 15 दिवसांनी पुढे ढकलण्यात आली आहे.

 

कर्नाटकात कोरोनाने पहिला बळी घेतला होता. गेल्या 24 तासाच्या आत कोरोनाचे 20 रुग्ण आढळले होते. त्यानंतर रुग्णांच्या संखेत झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत भारतात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 81 झाली आहे.

 

कोरोना व्हायरसने संपुर्ण जगात कहर केला आहे. आतापर्यंत जगभरात 1,34,679 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यात 5000 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. डब्ल्यूएचओच्या मते, 24 तासांत जगभरात 321 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.                                                                                                              

Find Out More:

Related Articles: