WHO ने केले भारताचे कौतुक, म्हणाले - आता सर्व तुमच्या हातात
Who भारताचे कौतुक केले आहे. कोरोना थांबवणं आता तुमच्या हाती आहे त्यांनी म्हटलं आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 499 पर्यंत पोहचली आहे. कोरोना वाढू नये यासाठी भारताने देशभरातल्या 548 जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन घोषित केले आहे. भारत कोरोनाचा प्रादु्र्भाव रोखण्यासाठी उचलत असलेली पावलं कठोर आहे. मात्र ही योग्य आहे. या प्रकारची पावलं उचलणं भारताने सुरु ठेवलं पाहिजे असंही WHO ने म्हटलं आहे. WHO चे कार्यकारी संचालक मायकल जे रेयान यांनी भारताचं कौतुक केलं आहे.
https://mobile.twitter.com/ANI/status/1242204094711783425?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1242204094711783425&ref_url=https%3A%2F%2Famnews.live%2F