महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला, कोरोनाचे 124 रुग्ण
या रुग्णांमध्ये मुंबईत सर्वाधिक 51 तर पुण्यामधील 19 रुग्णांचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये 12 आणि सांगलीत 9 रुग्ण आढळलेले आहेत. राज्याच्या ग्रामीण भागामध्येही कोरोनैाचे रुग्ण वाढताना दिसत आहे. यामुळे आता आरोग्य यंत्रणेपुढे मोठे आव्हान उभे आहे. लोकांनी गर्दी करू नये आणि एकमेकांच्या संपर्कात येऊ नये, असे वारंवार आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. मात्र तरीही नागरिक रस्त्यावर उतरत आहे. पोलीस अशा लोकांविरुद्ध कारवाई करताना दिसत आहेत.