कोरोनाचं थैमान सुरुच, महाराष्ट्रातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 193 वर

Thote Shubham
मुंबई : महाराष्ट्रात कोरोना विषाणूचं थैमान सुरुच आहे. लॉकडाऊननंतरही महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 193 वर पोहचला आहे. आज मुंबईत 4, जळगावमध्ये 1, सांगली 1, नागपूर 1 असे रुग्ण सापडले. यामुळे आरोग्य यंत्रणांच्या काळजीत वाढ झाली आहे.

कोरोनाचा सामना करण्यासाठी आता राज्यसरकारने खासगी रुग्णालयांची मदतही घेण्यास सुरुवात केली आहे. स्वतः राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली.


राजेश टोपे म्हणाले, “राज्यातील कोरोनाबाधितांना दिलासा देणारा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याअंतर्गत महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेत कोरोना उपचाराचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या रुग्णांना कॅशलेस उपचाराची सुविधा मिळणार आहे.

1 एप्रिलपासून राज्यभरात या योजनेंतर्गत सुमारे 1000 रुग्णालयांचा समावेश होणार आहे. त्यामध्ये कोरोनाबाधीत मोफत उपचार घेऊ शकतील. या महत्वपूर्ण निर्णयामुळे योजनेतील सहभागी रुग्णालयातील सुमारे 2000 व्हेंटीलेटर्स देखील उपलब्ध होणार आहेत”


“कोरोनाच्या नियंत्रणासाठी राज्य शासन करीत उपाययोजनांच्या माध्यमातून नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले जात आहे. राज्यात महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून सामान्यांना दीर्घ व उपचाराचा खर्च न परवडणाऱ्या आजारांवर उपचार व शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात.

या योजनेत राज्यभरातील 492 खासगी रुग्णालये सहभागी आहेत. येत्या 1 एप्रिलपासून त्यामध्ये दुपटीने वाढ होऊन 1000 रुग्णालयांचा समावेश होईल. जनआरोग्य योजनेंतर्गत खासगी रुग्णालयांच्या सहभागाची संख्या वाढणार आहे.

यामुळे कोरोनाच्या उपचारासाठी आवश्यकता भासल्यास किमान 2000 व्हेंटीलेटर्स उपलब्ध होवू शकतात. त्याचबरोबर सुमारे 1 लाख खाटाही यामाध्यमातून उपलब्ध होणार आहेत”, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली

Find Out More:

Related Articles: