राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 232 वर, तर देशात 1300 पेक्षा जास्त रुग्ण

Thote Shubham
मुंबई : कोरोना व्हायरसने देशभरात थैमान घातले आहे. दर तासाला कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होतांना दिसून येत आहे. राज्यात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 232 वर गेला आहे.

आज बुलडाण्यात दोन नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर पुण्यात 3  आणि मुंबईत 5 आणि नवी मुंबईत दोन रुग्णांची वाढ झाली आहे.


बुलडाणामध्ये पुन्हा दोन रुग्ण पॉझिटिव्ह, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुगणांच्या कुटुंबातील दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.


महाराष्ट्र

कोरोनाग्रस्त रुग्ण - 232
मृत्यू - 10
बरे झालेले रुग्ण - 39


देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 1300 च्या पार गेली आहे. तर आतापर्यंत 39 जणांचा या आजाराने बळी गेला आहे. देशात सर्वात जास्त बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहे.

भारत

कोरोनाग्रस्त रुग्ण - 1300
मृत्यू - 39
बरे झालेले रुग्ण - 113


कोरोना व्हायरसने संपुर्ण जगात थैमान घातले आहे. आतापर्यंत जगात 740,421 जणांना कोरोनाची लागण झाली असून 37 हजार जणांचा मृत्यू झाला आहे


संपुर्ण जग

कोरोनाग्रस्त रुग्ण - 740,421
मृत्यू - 37 हजार 
बरे झालेले रुग्ण - 164,325


कोरोना व्हायरसबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये. अशा सुचना वारंवार दिल्या असतांना देखील काही टवाळखोर नागरिक हुल्लडबाजी करण्यासाठी घराबाहेर पडत असल्याचे दिसून आले आहेत. अशा नागरिकांवर कारवाई करण्याच्या सुचना सरकारकडून देण्यात आल्या आहेत.

Find Out More:

Related Articles: