पुण्यात कोरोनामुळे 60 वर्षीय महिलेचा मृत्यू

frame पुण्यात कोरोनामुळे 60 वर्षीय महिलेचा मृत्यू

Thote Shubham
पुणे : पुण्यात कोरोनामुळे आणखी एक मृत्यू झाला आहे. काल रात्री 60 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पुण्यात आतापर्यंत कोरोना मृत्यूंची संख्या तीन एवढी झाली आहे.

तीन दिवसांपूर्वी 60 वर्षीय महिला नायडू रुग्णालयात दाखल झाली होती, यावेळी ती निगेटिव असल्यानं तिला डिस्चार्ज दिला होता.


मात्र घरी गेल्यानंतर इंक्युबॅशन पिरेडमध्ये असताना अचानक तब्येत ढासळल्याने काल पहाटे ससून रुग्णालयात पुन्हा दाखल करण्यात आलं, मात्र महिलेचा मृत्यू झाला होता.

मृत्यूनंतर सॅम्पल चेक केल्यानंतर कोरोना पॉझिटिव आढळली. संबंधित महिलेला रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला मात्र पुन्हा मृत्यूनंतर संबंधित महिलेचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Find Out More:

Related Articles:

Unable to Load More