जगात कोरोनाचे थैमान, आतापर्यंत एक लाख 14 हजार जणांचा मृत्यू

Thote Shubham

नवी दिल्ली : जगभरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 18 लाख पार पोहोचला असून आतापर्यंत एक लाख 14 हजारांहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. याबाबत वल्डोमीटर या संकेतस्थळाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची जगभरात संख्या 18,53,155 वर पोहोचली आहे.

 

तर 1,14,247 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जगभरातील सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत झाले आहेत. तर मृतांच्या आकड्यांमध्ये इटली दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून इटलीमधील मृतांच्या आकड्यात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

 

मागील 24 तासात अमेरिकेतील न्यूयॉर्क राज्यात 758 लोकांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. न्यूयॉर्कचे गव्हर्नर एंड्रयू क्युमो यांनी सांगितले की, कोरोनामुळे होणाऱ्या मृतांच्या आकड्यात फारशी घट झालेली नाही. पण काही प्रमाणात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

758 लोकांचा 11 एप्रिल रोजी मृत्यू झाला होता. राज्यात कोरोनाचा 1,80,458 पेक्षा जास्त लोकांना संसर्ग झाला होता. तर मृत्यू झालेल्यांची संख्या 9,385 एवढी आहे. संपूर्ण अमेरिकेतील मृतांचा आकडा 22,115 आणि संसर्ग झालेल्यांचा आकडा 560,433 एवढा आहे.



कोरोनाचा अमेरिकेनंतर प्रादूर्भाव इटलीमध्ये पाहायला मिळतो. आतापर्यंत इटलीमध्ये 19,899 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर संसर्ग झालेल्यांची संख्या 1,56,363 वर पोहोचली आहे. आतापर्यंत इटलीमध्ये 34,211 रूग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत. इटलीमध्ये तीन आठवड्यांमध्ये रविवारी मृतांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळाले. इटलीमध्ये रविवारी 431 लोकांचा मृत्यू झाला आहे.


या महामारीमुळे फ्रान्समधील 14,393 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 1,32,591 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दरम्यान, मागील तासांमध्ये मृतांच्या संख्येत कमतरता आली आहे. मंत्रालयाने सांगितले की मागील एक दिवसात 315 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एक दिवसापूर्वी 345 लोकांचा मृत्यू झाला होता. याव्यतिरिक्त आयसीयूमध्ये दाखल करण्यात येणाऱ्या रूग्णांच्या संख्येत चौथ्या दिवशी कमतरता दिसून आली आहे.


कोरोना व्हायरसमुळे ब्रिटनमध्ये 10,612 लोकांचा मृत्यू झाला आहे. संसर्ग झालेल्यांची संख्या 84,279 वर पोहोचली आहे. कोरोना व्हायरसची लक्षणे आढळल्यानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी रविवारी हॉस्पिटलमधून सुट्टी देण्यात आली आहे. स्पेनमध्ये कोरोनामुळे 17,209 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर कोरोना बाधितांची संख्या 1,66,831वर पोहोचली आहे.


या महामारीमुळे चीनमध्ये आतापर्यंत 3,341 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर संसर्ग झालेल्यांची संख्या एकूण 82,160 वर पोहोचली आहे. यामध्ये 77,663 लोक बरे झाले आहेत. चीनमध्ये अद्याप कोणताही मृत्यू झालेल्याती माहिती नाही.

Find Out More:

Related Articles: