राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 3202 वर, एकट्या मुंबईत 2043 रुग्ण
आज दिवसभरात एकट्या मुंबईत तीन जणांच्या मृत्यूसह आतापर्यंत 107 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता 2 हजार 43 वर पोहचला आहे. या आकडेवारीत आतापर्यंत मृत्यू झालेल्या 116 जणांचा समावेश आहे. देशातसुद्धा कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने सरकारकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी उपाय योजणा करण्यात येत आहेत. एवढंच नाही तर जागतिक आरोग्य संघटनेसोबतही चर्चा झाल्याचं केंद्रीय आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे. कोरोना बाबत आपल्याला अधिकच सतर्क राहावं लागणार असल्याचं त्यांनी म्हंटल आहे. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.
https://mobile.twitter.com/rajeshtope11/status/1250828538267213831?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1250828538267213831&ref_url=https%3A%2F%2Famnews.live%2F