राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 5649 वर, एका दिवसात 18 बळी
तर दुसरीकडे आज राज्यात 18 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यात मुंबईत 10, पुणे 2, औरंगाबाद 2 तर कल्याण डोंबिवली, सोलापूर, जळगाव आणि मालेगावात प्रत्येकी एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आज मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये 14 पुरुष आणि 4 महिलांचा समावेश आहे. यात 18 पैकी 12 रुग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृत्यूंची संख्या 269 वर पोहोचली आहे.