
देशभरात कोरोना रुग्णांची संख्या 37 हजार पार, आतापर्यंत 1218 लोकांचा मृत्यू
महाराष्ट्र, दिल्ली, गुजरातमधील रुग्णांमध्ये सातत्याने वाढत आहे. यामुळे सरकारचे टेंशन वाढले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता लॉकडाउन दोन आठवड्यांसाठी वाढवले आहे. दरम्यान ग्रीन झोन व्यक्तीरिक्त रेड आणि ऑरेंज झोनमध्ये काही अटी शर्थींसह नियम शिथील करण्यात येणार आहे.
दरम्यान भारतात आता कोरोनाचे 26167 अॅक्टिव्ह केस आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानुसार देशात गेल्या 24 तासात कोरोनाच्या 2293 नव्या केस समोर आल्या आहेत. तर 71 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान सीआरपीएफच्या जवानांमध्येही कोरोना व्हायरस पसरत आहे. सीआरपीएफमध्ये कोरोना संक्रमित जवानांची संख्या वाढून 122 एवढी झाली आहे. तर आतापर्यंत 150 सीआरपीएफच्या जावानांची कोरोना टेस्टचा रिपोर्ट येणे बाकी आहे.