कोरोनावरील लस येण्यासाठी अजून दोन वर्ष लागतील – जागतिक आरोग्य संघटना

frame कोरोनावरील लस येण्यासाठी अजून दोन वर्ष लागतील – जागतिक आरोग्य संघटना

Thote Shubham
वॉशिंग्टन : जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष दूत डेव्हिड नाबारो यांनी कोरोनावरील लस येण्यासाठी दोन वर्ष लागतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे प्रत्येकानं कोरोनाशी जुळवून घेत जगायला शिकावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष राजदूत डेव्हिड नाबारो यांनी एका मुलाखतीत बोलताना भारतानं कोरोनाविरोधात केलेल्या उपाययोजनांचं कौतुक केलं. भारतीय नागरिक करोनाशी जुळवून घेत जगू शकतो.

अशाच पद्धतीच्या जीवनशैलीनं करोनाला बाजूला ठेवता येऊ शकतं. देशातील प्रत्येक नागरिकाला करोनाविषयी शिक्षित करणं हे संसर्गाची साखळी तोडण्यातील महत्त्वाचा मुद्दा आहे, असं नाबारो म्हणाले होते.


भारतानं ज्या पद्धतीनं करोनाची परिस्थिती हाताळली, त्यातून पुढील टप्प्याला यशस्वीपणे सामोरं जाण्याचा आत्मविश्वास त्यातून मिळाला आहे. उल्लेख करण्यासारखी बाब म्हणजे भारतातील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी जगाच्या तुलनेत कमी आहे, असं डेव्हिड नाबारो यांनी म्हटलं आहे.

Find Out More:

Related Articles:

Unable to Load More