
औरंगाबादेत कोरोनाचे 24 नवे रुग्ण, दोन बळी एकूण संख्या 677 वर
अरुणोदय कॉलनी (बीड बाय पास) येथील 94 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. 94 वर्षीय महिलेचा मंगळवारी मृत्यू झाला. मृत्यू पश्चात अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर हुसेन कॉलनी येथील 56 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. यानंतर मंगळवारी रात्री 8 वाजता महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे आता शहरातील कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्या ही 17 वर गेली आहे.
तर शहरात आज पुन्हा नवे 24 रुग्ण आढळले. यामध्ये एक रुग्ण जालन्यातील आहे. यामुळे आता एकूण कोरोना रुग्णांची संख्या 677 वर गेली आहे. यामुळे औरंगाबादकरांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. दरम्यान दिलासादायक बातमी म्हणजे आतापर्यंत 117 जण हे कोरोनामुक्त झाले आहेत.