आत्महत्या करण्यास निघालेल्या मुलीला वाचविले

मंचर -आई रागवली म्हणून नाराज आत्महत्या करण्यास निघालेल्या 16 वर्षीय मुलगी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी वाचविले आहे. तसेच तिला ताब्यात घेऊन घोडेगाव पोलिसांकडे सुपूर्त केले. घोडेगाव पोलिसांनी शनिवारी (दि. 10) रात्री आंबेगाव गावठाण येथे जाऊन तिला कुटुंबीयांकडे सुपूर्त केले.

घरातील किरकोळ कारणावरुन आत्महत्या करण्यासाठी निघालेल्या रोशनी कोळप या मुलीला चिंचोलीजवळील घोडनदीपुलाजवळ नैनेश काळे याने अडविले. बजरंग दलाचे सागर काळे, सुरज दराडे, राजू आकले, सुमित दिवेकर, विनोद वायाळ यांना नैनेश काळे यांनी बोलावून घेतले. तसेच रोशनी कोळप हिच्याकडे विचारपूस केली असता तीने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे रोशनी कोळप हिला घोडेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी तिच्या गावाच्या नावाची विचारपूस केली असता तिने कधी जांभोरी, कधी गंगापूर तर शेवटी लांडेवाडी येथील असल्याचे सांगितले.

यानंतर पोलीस हवालदार अलका किर्वे, संगिता मघे व बजरंग दलाचे कार्यकर्ते लांडेवाडी येथे घेऊन गेले. लांडेवाडी येथे गेल्यानंतर मला सोडून द्या, मी माझी घरी जाईल असे ती सांगू लागली. यावेळी महिला पोलिसांनी तिला पोलिसी भाषेत पत्ता विचारला असता तिने आंबेगाव गावठाण येथील असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तिला कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.


Find Out More:

Related Articles: