देशातील ‘या’ गावाने दिले आहेत सर्वाधिक आयपीएस, आयएएस आणि पीसीएस अधिकारी
विद्वानांची खाण म्हणून आपला भारत देश हा ओळखला जातो. भारतीयांचा झेंडा जगभर आपल्या बुद्धीमत्तेच्या, विदवत्तेच्या आणि कौशल्यांच्या जोरावर डौलाने डौलत होता. अशा या आपल्या देशात एक गाव असेही आहे, आपल्या देशाला ज्या गावाने सर्वाधिक आयपीएस, आयएएस आणि पीसीएस अधिकारी दिले आहेत.
केवळ २०५ कुटुंब असलेल्या या गावातून एक-दोन नव्हे तर ४० हून अधिक आयपीएस, आयएएस आणि पीसीएस अधिकारी भारताच्या सेवेत कार्यरत आहेत.
माधोपट्टी असे या गावाचे नाव आहे. लखनौपासून २४० किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. हे गाव अधिकाऱ्यांचे गाव म्हणून ओळखले जाते. जौनपूर जिल्ह्यात असलेल्या या गावात सर्वाधिक आयएएस, आयपीएस आणि पीसीएस अधिकारी आहेत. या गावातील साधारणपणे ६२% अधिकारी हे साक्षर आहेत.
या गावातून आतापर्यंत ४७ आयएएस, आयपीएस आणि पीसीएस अधिकारी बाहेर पडले आहेत. एवढेच नाही तर या गावातील इतर मुले हे बँक आणि अन्य बड्या नोकऱ्यांवर कार्यरत आहेत.
१९१४ मध्ये गावातील मुस्तफा हुसैन हे पहिल्यांदा पीसीएस परिक्षा उत्तीर्ण झालेले व्यक्ती आहेत. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन येथील विद्यार्थी प्रशासकीय सेवेकडे वळतात. या गावातील प्रत्येक घराघरातील किमान एक विद्यार्थी तरी पदवीधर आहे. भारताच्या विविध भागात येथील तरूण अथवा तरुणी कार्यरत आहेत.