तब्बल 37 हजार फूट ऊंचीवर विवाहबद्ध झाले हे जोडपे
लग्न हटके स्टाईलमध्ये करण्याची प्रत्येक जोडप्याची इच्छा असते. अशाच एका हटके लग्नाची माहिती समोर आली आहे. एका कपलने 37 हजार फूट उंचावर विमानात लग्न केले आहे. न्यूझीलँडची नवरी आणि ऑस्ट्रेलियाच्या नवरदेवाने ऑकलेंडला जाणाऱ्या कमर्शियल जेटस्टार फ्लाइट 201 मध्ये लग्न केले.
या लग्नासाठी विमानाचे पँसेंजर उपस्थित होते. एअरलाइनने या लग्नासाठी या कपलकडून कोणतेही शुल्लक घेतले नाही. उलट त्यांच्या इच्छेनुसार त्यांना मदत केली. सिडनीवरून टेक ऑफ घेतलेल्या विमानात या नवरा-बायकोने कायम सोबत राहण्याचे एकमेंकाना वचन दिले.
लग्नानंतर नवरी कॅथी म्हणाली की, हा सर्वात सुंदर अनुभव होता. आम्ही संपुर्ण आयुष्य हे लक्षात ठेवू. आमची ओळख 2011 मध्ये कॉम्प्यूटर गेम खेळताना झाली होती. त्यानंतर 2 वर्षांनी डेव्हिडसोबत सिडनी विमानतळावर भेट झाली. आधी डेव्हिडने ब्रिसबेन ते मेलबर्न जाणाऱ्या विमानात प्रपोज करण्याची योजना बनवली होती. मात्र त्याने ते केले नाही. मात्र डेव्हिडने त्याच सांयकाळी प्रपोज केले.
कॅथीने सांगितले की, तिला तिचे लग्न अविस्मरणीय करायचे होते. त्यामुळे तिने तिची कल्पना जेट स्टारच्या फेसबुक पेजवर पोस्ट केली. जेट स्टारला देखील ही कल्पना आवडली व त्यांना एकही रुपया न घेता लग्नाची सर्व व्यवस्था केली.