हॉलिवूडचा “आरडीजे’ भारतात सर्वात लोकप्रिय अभिनेता

frame हॉलिवूडचा “आरडीजे’ भारतात सर्वात लोकप्रिय अभिनेता

Thote Shubham Laxman

हॉलिवूड चित्रपटांचा एक मोठा चाहतावर्ग भारतात निर्माण झाला असून हॉलिवूडचे अनेक अभिनेते भारतात लोकप्रीय आहेत. ज्यात टॉम क्रुझ, विल स्मिथ, रॉबर्ट दाऊनी ज्युनियर, ख्रिस इवान्सचा चाहतावर्ग फार मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, यातील सर्वात लोकप्रिय अभिनेता कोणता याचे उत्तर कोणा जवळच नव्हते. परंतू, समोर आलेल्या माहितीनुसार हॉलिवूड अभिनेता रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर (आरडीजे) हा भारतात सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता ठरला आहे.               

नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेक्षणानुसार, “आर्यन मॅन’ या सुपर हिरो रोलसाठी प्रसिद्ध असलेला रॉबर्ट डाउनी ज्युनिअर हा भारतातला सर्वाधिक लोकप्रिय हॉलिवूड अभिनेता ठरला आहे. 100 पैकी 100 गुण मिळवून त्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याच बरोबर हॉलिवूडमध्ये अनेक महत्वपूर्ण भुमिका साकारणारा विल स्मिथ हा दुसरा सर्वात लोकप्रिय हॉलिवूड अभिनेता आहे.                           

तर, सुपर हिरो थोरची भुमिका साकारनारा अभिनेता क्रिस हेम्सवर्थ हॉलिवूड अभिनेत्यांच्या लोकप्रियतेत तिसऱ्या स्थानी आहे. त्याने 73 गुण मिळवत तिसरे स्थान पटकावले आहे. तर कॅप्टन अमेरिका क्रिस्टोफर इवांस हा या यादीत चौथ्या स्थानावर आहे. दरम्यान, तर, अभिनेता लिओनार्डो डिकॅप्रिओ 45 गुणांसह पाचव्या रॅंकिंगवर आहे.                     


Find Out More:

Related Articles:

Unable to Load More