टर्मिनेटर येतोय पुन्हा
प्रोफेशनल बॉडी बिल्डर आणि हॉलिवूड ऍक्टर अर्नोल्ड श्वार्नझेनेगरनी “टर्मिनेटर’ सिरीजमधील पुढचा सिनेमा आपण करत असल्याचे सांगितले आहे. “टर्मिनेटर’ या पॉप्युलर सायन्स फिक्शन सिरीजच्या सहाव्या भागामध्ये अर्नोल्ड लवरकरच दिसणार आहे. मात्र यावेळी जेम्स कॅमेरून डायरेक्शन करणार नसल्याचे अर्नोल्डने स्पष्ट केले आहे.
“टर्मिनेटर’ सिरीजमधील दुसरा भाग “टर्मिनेटर 2- जजमेंट डे’ 3 जुलै 1991 रोजी रिलीज झाला होता. त्यामध्ये सर्व जगातील 3 अब्ज लोक 29 ऑगस्ट 1997 रोजी होणाऱ्या अणूयुद्धात मरण पावतील अशी भविष्यवाणी होती. त्यामुळे 1997 सालापर्यंतची उत्सुकता ताणली गेली होती. त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक भागात भविष्यात घडणाऱ्या आणि इतिहासाशी नाते जोडलेल्या यंत्रयुगातील घडामोडींची शृंखला बघायला मिळाली.
त्यावेळी “टी 2′ हा सर्वात महागडा सायन्स फिक्शन सिनेमा ठरला होता. अर्नोल्डला सायन्स फिक्शन हिरोच्या रोलमध्ये उभे करण्यासाठी जेम्स कॅमेरूनला मोठे कष्ट पडले होते. आता “टर्मिनेटर 6-डार्क फेट’मध्ये अर्नोल्ड, लिंडा हॅमिल्टन आणि एडवर्ड फर्लों यांना आपण पुन्हा एकदा बघू शकणार आहोत. आता “टी-2’चे रुपांतर “टी-1000’मध्ये झालेले असेल. तो ज्याला स्पर्श करेल, त्या गोष्टीत त्याचे रुपांतर होण्याची क्षमता त्याला प्राप्त झाली असेल.
अर्थात यामध्ये थरारक पाठलाग, जीवघेणा गोळीबार, थरकाप उडवणारे स्टंट असणार आहेतच. त्याशिवाय नेत्र्दिवक ऍनिमेशन आणि ग्राफिक्सचाही मारा असणार आहे. डोक्याला मुंग्या आणणाऱ्या कथानकाची गुंतागुंत अनुभवायची असेल, तर पुन्हा एकदा “टर्मिनेटर’ला भेटायलाच पाहिजे. अर्थात यावेळचा अर्नोल्ड हा 91 साली आलेल्या पहिल्या टर्मिनेटर इतका हॅन्डसम आणि चपळ असणार नाही. कितीही झाले तरी तो काही रोबो नाही, माणूसच आहे.