या लिपलॉक सीनमुळे चर्चेत आली बॉलिवूडची ही अभिनेत्री
सध्या एका दाक्षिणात्य चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. मनमधुडू २ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटात नागार्जुन आणि रकुल प्रीत सिंह यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचे चांगले प्रेम मिळत आहे. पण त्याचसोबत चित्रपट चांगलाच वादात अडकला आहे. या चित्रपटातील एका दृश्यामुळे हा वाद निर्माण झाला आहे. एका चित्रपटातील एक लीपलॉक सीन सध्या चांगलाच चर्चेत आहे.
या चित्रपटाच्या एका दृश्यात रकुल प्रित सिंग तिच्या महिला सहकलाकारासोबत लीप लॉक सीन देताना दिसत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन चिन्मई श्रीपादाचे पती राहुल रविंद्रन यांनी केले आहे. या दृश्यावरून प्रेक्षकांनी चिन्मईला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले आहे. चिन्मईला ट्रोल करण्यामागे एक खास कारण आहे. चिन्मईने काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या संदीप रेड्डी वांगा यांनी दिग्दर्शित केलेल्या कबीर सिंग या चित्रपटावर आक्षेप नोंदवला होता. संदीपने कबीर सिंग या चित्रपटाबाबत मत व्यक्त करताना या चित्रपटातील गोष्टी कशाप्रकारे योग्य असल्याचे म्हटले होते. त्यावर अनेकांनी त्यांना सोशल मीडियावर पाठिंबा दर्शवला होता. पण चिन्मईने त्यांना सोशल मीडियावर चांगलेच सुनावले होते. पण आता त्यांचाच चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला असल्याने त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.
मनमधुडू २ या चित्रपटाच्या ट्रेलरचे काही दिवसांपूर्वी चिन्मईने कौतुक केले होते. त्यामुळे प्रेक्षक तिच्यावर प्रचंड चिडले होते. कारण या ट्रेलरमध्ये रकुल स्मोकिंग करत असताना दाखवण्यात आले होते. त्यामुळे चिन्मईचे हे दुटप्पी वागणे लोकांना आवडले नाहीये. तिच्या या वागण्यामुळेच तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.