आणखी एका तेलुगू चित्रपटाच्या रिमेकमध्ये झळकणार शाहिद कपूर

frame आणखी एका तेलुगू चित्रपटाच्या रिमेकमध्ये झळकणार शाहिद कपूर

Thote Shubham
पुन्हा एकदा तेलुगू चित्रपटाच्या रिमेकमध्ये बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर झळकणार आहे. ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगू चित्रपटाचा त्याचा ‘कबीर सिंग’ हा चित्रपट देखील रिमेक होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने दमदार कमाई केली आहे. तसेच या चित्रपटाला प्रेक्षकांनीही चांगला प्रतिसाद दिला. आता पुन्हा एकदा शाहिदची तेलुगू चित्रपटाच्या रिमेकसाठी वर्णी लागली आहे.

बॉलिवूडमध्ये लवकरच ‘जर्सी’ या तेलुगू चित्रपटाचा रिमेक तयार होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गौतम तिन्नाउरू हे करणार आहेत. मुळ चित्रपटाचेही दिग्दर्शन त्यांनीच केले होते. या चित्रपटाची निर्मिती अलू अरविंद, अमन गिल आणि दिल राजू हे करणार आहेत. चित्रपटाच्या रिलीज डेटही जाहीर झाली असून पुढच्या वर्षी २८ ऑगस्टला हा चित्रपट रिलीज होणार आहे.                                                                                                                                                                                          



Find Out More:

Related Articles:

Unable to Load More