
दिशा-आदित्यच्या मलंगचा ट्रेलर रिलीज
नुकताच आदित्य रॉय कपूर आणि दिशा पाटनी अभिनीत मलंग चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. ही जोडी पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करत असल्याने त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहता येणार आहे. दिशा आणि आदित्यसह या चित्रपटात कुणाल खेमू आणि अनिल कपूर यांच्याही मुख्य भूमिका आहेत.
या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी रिलीज केले होते. यातील एका पोस्टरमध्ये दिशा पाटनी, आदित्य कपूरच्या खांद्यावर बसून लिपलॉक करताना दिसत होती. सोशल मीडियावर चित्रपटाचे हे पोस्टर तुफान व्हायरल झाले होते. २ मिनिटे ४५ सेकंदांचा मोहित सुरी दिग्दर्शित मलग चित्रपटाचा ट्रेलर आहे. ३डी इफेक्टवाल्या या ट्रेलरमुळे प्रेक्षकाचे संपूर्ण लक्ष ट्रेलरवरच राहते. चारही व्यक्तिरेखांमध्ये एका गोष्टीचे साम्य ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले असून, चौघांनाही प्राण घ्यायला आवडत असते. आता कोण कोणाचे प्राण घेतो हे आपल्याला चित्रपट रिलीज झाल्यानतंर आपल्याला कळेल.
दिशा आणि आदित्यच्या केमिस्ट्रीवर चित्रपटात भर देण्यात आला आहे. चित्रपटात लव्ह सिक्वेन्ससह अॅक्शनचाही भडीमार आहे. ट्रेलरमध्ये अनिल कपूर चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत असल्याचे स्पष्ट कळते. पण दिशा, आदित्य आणि कुणालच्या भूमिकेचा खुलासा करण्यात आला नाही. लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी मिळून मोहित सुरी दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती केली आहे. यासोबत गुलशन कुमार आणि टी-सीरिजने चित्रपटाची निर्मिती केली आहे. असिम अरोडाने ही थ्रिलिंग लव्ह स्टोरी लिहिली असून हा चित्रपट येत्या ७ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.