आदित्य नारायणसोबत विवाहबद्ध होणार नेहा कक्कर?

frame आदित्य नारायणसोबत विवाहबद्ध होणार नेहा कक्कर?

Thote Shubham

मागील काही दिवसांपासून सिंगिंग रिअलिटी शो इंडियन आयडॉलमुळे बॉलिवूडची लोकप्रिय गायिका नेहा कक्कर चर्चेत आहे. नेहाची चर्चा शोच्या प्रत्येक एपिसोडमध्ये होतेच. कधी तिला स्पर्धकांची स्ट्रगल स्टोरी ऐकून रडू येत तर कधी एखाद्याच्या टॅलेंटची दाद देत ती त्या स्पर्धकाला बक्षीस देते. पण नेहाच्या चाहत्यांसाठी आता काहीशी धक्कादायक बातमी असून नेहाच्या लग्नाची तयारी इंडियन आयडॉलच्या मंचावरच झाल्याचे बोलले जात आहे.

 

त्याचबरोबर ती ज्या मुलाशी लग्न करणार आहे त्याचे संपूर्ण कुटुंबही भेटले. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या या भेटीचे फोटो व्हायरल झाले आहेत. नुकतीच या शोमध्ये इंडियन आयडॉलचा सुत्रसंचालक आदित्य नारायणचे वडील उदित नारायण यांनी आपल्या पत्नीसह हजेरी लावली होती.

 

यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार उदित नारायण आणि अलका यागनिक आगामी एपिसोडमध्ये इंडियन आयडॉलच्या मंचावर दिसणार आहेत. उदित नारायण यावेळी त्यांचा मुलगा आणि नेहा कक्कर यांची मस्करी करताना दिसणार आहे. ते हेही सांगताना दिसणार आहेत की, ते हा शो पहिल्या दिवसापासून फॉलो करत आहेत याची दोन कारणे आहेत. एक तर या शोमध्ये सर्वच स्पर्धक खूप टॅलेंटेड आहेत आणि दुसरे म्हणजे ते नेहा कक्करला सून म्हणून घरी आणण्याचा विचार करत आहेत.

 

उदीत नारायण यांनीच नाही तर त्याची आई दीपा नारायण यांनी सुद्धा नेहाला सून म्हणून घरी आणण्याचा विचार केला आहे. त्याचबरोबर नेहाच्या आई-बाबांनीही यावेळी या शोमध्ये हजेरी लावली होती आणि या दोघांच्या लग्नाला त्यांनीही मान्यता दिली आहे. दरम्यान दोन्ही कुटुंबियांच्या भेटीनंतर आदित्य खूप खूश दिसला, पण नेहाने सांगितले की मी जर एवढ्या लवकर लग्नाला तयार झाले तर मग काही मजा राहणार नाही. हा एपिसोड शूट झाला असून लवकरच तो प्रसारित केला जाणार आहे.

 

Find Out More:

Related Articles:

Unable to Load More