लवकरच तीन नव्या फिचर्सचा होणार व्हॉटसअॅपमध्ये समावेश

Thote Shubham

नवी दिल्ली : सध्याच्या घडीला तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या व्हॉटसअॅपमध्ये लवकरच तीन नव्या फिचर्सचा समावेश करण्यात येणार आहे. टेस्टर्ससाठी अॅण्ड्राइड बीटा व्हर्जन २.२०.१४ रोलआउट करणे सुरू झाले असून तीन नवीन फिचर्स या अपडेटद्वारे युजर्सला मिळणार आहेत. याबाबत व्हॉट्सअॅप अपडेट्सबाबत माहिती देणाऱ्या WABetaInfoने सांगितले की, व्हॉट्सअॅपचे अॅनिमेटेड स्टिकर्स फिचर अधिक चांगले करत असून त्याचबरोबर डिलीट मेसेजच्या फिचरवर देखील सध्या काम सुरू आहे.

 

व्हॉट्सअॅपने नुकतेच आयफोन युजर्ससाठी नवीन फिचर लाँच केले आहे. नवीन आयफोन डिव्हाइसमध्ये ज्याच्या मदतीमुळे iCloud Keychain एनेबल असताना कोणतेही डिटेल्स न सांगता रजिस्टर करता येणार आहे. अॅण्ड्राइड युजर्ससाठीदेखील व्हॉट्सअॅप अशाच पद्धतीचे खास फीचर आणणार आहे.

 

आता अॅनिमेटेड स्टिकर्स व्हॉट्सअॅपवर पाठवता येणार आहेत. अॅनिमेटेड स्टिकर्स अॅपमध्ये प्ले बटणाच्या आयकॉनमध्ये दिसणार आहे. जेणेकरून युजर्सना अॅनिमेटेड आणि नॉन अॅनिमेटेड स्टिकर्स लवकर समजता येतील. सध्या हे फिचर प्राथमिक स्तरावर असून याची अद्याप चाचणी सुरू झालेली नाही.

 

त्याचबरोबर डिलीट मेसेज फिचरमध्ये देखील सुधारणा करण्यात येणार आहे. अॅपवर डिलीट मेसेज फिचर ऑन आणि ऑफ हेदेखील दिसणार आहे. तसेच नवीन फिचरनुसार ग्रुपवर आलेला मेसेज आता किती वेळेनंतर डिलीट करायचा आहे ते ग्रुप अॅडमिन ठरवणार आहे. अॅडमिनने याद्वारे ठरवलेल्या वेळेनंतर संबंधित मेसेज डिलीट होणार आहे. व्हॉट्सअॅप यासोबतच आपल्या तिसऱ्या फिचरवरही काम करत आहे. याच्या मदतीने नवीन डिव्हाइसवर व्हॉट्सअॅप अकाउंट ट्रान्सफर करणे सोपे होणार आहे.

Find Out More:

Related Articles: