
करिश्मा तन्नाच्या कमनीय बंद्यावर चाहते फिदा
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा तन्ना पुन्हा एकदा चर्चेत आली असून ती कोणत्याही सीरियलमुळे नव्हे, तर यावेळी ती तिने शेअर केलेल्या फोटोमुळे चर्चेचा विषय ठरत आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर करिश्माने बिकिनीमधील एक फोटो पोस्ट केला आहे.
करिश्माने या फोटोमध्ये आपल्या मादक आणि कमनीय देहाचे दर्शन तिच्या चाहत्यांना घडवले आहे. आजचे गुरुवारचे औचित्य साधून हा Throwback फोटो तिने पोस्ट केला आहे. नुकतीच मालदीवला करिश्मा गेली होती, हा फोटो त्यावेळचा असल्याचे दिसत आहे. ती एका नयनरम्य बीचवर या फोटोमध्ये उभी राहिली आहे.

करिश्मा तन्ना आपल्या बोल्ड इमेजमुळे लोकप्रिय आहे. कोणत्याही पोशाखात ती अतिसुंदर दिसते, तशीच ती या बिकनीमध्येही दिसत आहे. सोशल मीडियावरही करिश्मा खूप सक्रिय असते.
तिचे इन्स्टाग्रामवर 39 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच स्टाईलिश फोटो पोस्ट करत असते. 2019 मध्ये करिश्माच्या मालदीव ट्रीपची बरीच चर्चा झाली होती. आता अशीच चर्चा या बिकनी फोटोची होत आहे.