विराटच्या ‘राँग’ चा एबी डीविलीअर ब्रांड अम्बेसिडर

Thote Shubham

टीम इंडियाचा कप्तान आणि तरुणाईचा फॅशन आयकॉन विराट कोहलीने त्याच्या ‘राँग’ या ब्रांडेड कपड्यांसाठी द.आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू एबी डीविलीअर्स याच्याबरोबर ब्रांड अम्बेसिडर म्हणून करार केला आहे. हा ब्रांड सुरु केल्यापासूनच देशात खूप लोकप्रिय बनला आहे.

 

विराट आणि एबी डीविलीअर्स आयपीएल मध्ये रॉयल चॅलेंजर बंगलोर कडून खेळतात आणि मैदान तसेच मैदानाबाहेर ते अनेक वर्षे एकत्र आहेत. आता ‘राँग’च्या निमित्ताने ते व्यावसायिक भागीदार बनत आहेत.

 

या ब्रांड विषयी बोलताना एबी म्हणाला, कपडे कोणते वापरावे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्ही ज्या कपड्यात कम्फर्टेबल असता ते कपडे सगळ्यात उत्तम. कपडे कम्फर्टेबल नसतील तर तुमच्या हालचालीतून ते जाणवते आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या व्यक्तीमत्वावर पडतो. कपडे फार सैल नसावेत तसेच घट्ट नसावेत.

 

विराटचा ‘राँग’ ब्रांड प्रामुख्याने शहरी युवा वर्गाला नजरेसमोर ठेऊन बनला आहे. त्यात कुठेही सहज वापरता येतील आणि व्यक्तिमत्वाला उठाव देतील असे शर्ट, टी शर्ट, पँटसच्या अनेक व्हरायटी असून त्यांची किंमत १५०० च्या पुढे आहे. शॉपर्स स्टॉप, मंत्रा मध्ये हे कपडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.                                                            

 

Find Out More:

Related Articles: