कनिका कपूरच्या अडचणीत वाढ, कोरोनाचा तिसरा रिपोर्टही पॉझिटिव्ह

frame कनिका कपूरच्या अडचणीत वाढ, कोरोनाचा तिसरा रिपोर्टही पॉझिटिव्ह

Thote Shubham
मुंबई : बॉलिवूड गायिका कनिका कपूरच्या अडचणीत वाढ झाली आहे. कनिकाचा कोरोनाचा तिसरा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. कनिका कपूर काही दिवसांपूर्वीच लंडन मधून भारतात आली होती. त्यानंतर तिने अनेकांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. मात्र कनिकाला काही दिवसांनी करोनाच्या संसर्गाचा त्रास होण्यास सुरवात झाली. त्यानंतर तिला कोरोना झाला असल्याचं समोर आलं.

कनिका कपूरला कोरनाची लागण झाल्यामुळे संपूर्ण देशात आणि बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली होती. कनिकाच्या पॉझिटिव्ह अहवालानंतर तिच्या संपर्कात आलेल्या अनेक दिग्गज नेत्यांनी स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतले होते. विशेष म्हणजे राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनीही स्वत:ची टेस्ट केली. पण त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान कनिकानं तिला कोरोनाची लागण झाल्याची माहिती तिच्या सोशल मीडिया अकउंटवरुन शेअर केली होती.कनिकानं लिहिलं, ‘मागच्या 4 दिवसांपासून मला तापाची लक्षण दिसत होती. त्यामुळे मी टेस्ट करुन घेतली आणि माझी COVID-19 टेस्ट पॉझिटीव्ह आली. मी पूर्णपणे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत आहे.’ मात्र कनिकाच्या या मेसेजनंतर अनेकांनी तिला सोशल मीडियावरून लक्ष्य केले होते.

Find Out More:

Related Articles:

Unable to Load More