कनिका कपूरने सोडले मौन, सोशल मीडियावर मांडली आपली बाजू

Thote Shubham

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूरला देखील कोरोनाची बाधा झाली होती. गायिका कनिका कपूर लंडनहून परतल्यानंतर तिने काही पार्ट्यांमध्ये हजेरी देखील लावली होती. पण जेव्हा कनिका कपूर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समजले तेव्हा तिला लखनऊच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

या पार्टी दरम्यान कनिका अनेक नेत्यांना भेटली. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तिच्यावर कोरोनाची माहिती लपवण्याचा आणि हेतुपुरस्सर लोकांमध्ये विषाणूचा संसर्ग केल्याचा आरोप करण्यात आला होता. पण आता कोरोनामुक्त झालेली कनिका कपूरने यावर आपले स्पष्टीकरण दिले आहे.

 

कनिकाने नुकतीच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की, मला माहिती आहे की माझ्यामुळे बर्‍याच चर्चांना उधाण आले होते. काही चर्चांनी जाणीवपूर्वक आग लावून देण्याचे काम केले. त्यावेळी मी शांत बसणे पसंत केले.

 

कारण मी चुकीची होती म्हणून नव्हे तर मला माहित होते की माझ्याबद्दल अनेक अफवा आणि खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. म्हणून मी त्यासाठी वेळ जाऊ दिला कारण मला पूरेपुर जाणीव होती की सत्य एकना एक दिवस समोर येईल.

 

कनिका कपूर पुढे म्हणाली, यासाठी मी काही तथ्य आपल्याबरोबर शेअर करू इच्छिते. सध्या मी आई-वडिलांसह लखनौमध्ये दर्जेदार वेळ व्यतीत करत आहे. यूकेहून आल्यानंतर ज्या सर्व लोकांशी मी संपर्कात आले. त्यांच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसली नाहीत, उलट प्रत्येकाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला.

मी 10 मार्च रोजी यूकेहून मुंबईला परत आली आणि आंतरराष्ट्रीय विमानतळावरही माझी चाचणी घेण्यात आली. त्यावेळी कोणतीही अॅडव्हायजरी नव्हती. 18 मार्च रोजी यूकेमध्ये एक अॅडव्हायजरी आली, ज्यात लिहिले होते की स्वतःला क्वॉरंटाईन ठेवणे आवश्यक आहे. मला स्वत: ला या रोगाची कोणतीही लक्षणे दिसली नाहीत, म्हणून मी स्वत: ला क्वॉरंटाईन केले नाही.


आपल्या संपूर्ण प्रवासाविषयी माहिती देताना कनिका कपूरने लिहिले की, मला आशा आहे की लोक या प्रकरणात सत्य आणि संवेदनशीलतेचा सामना करतील. मानवांवर नकारात्मकता लादल्याने सत्य बदलत नाही. कनिका कपूरच्या या पोस्टवर लोक बरीच कमेंट करत आहेत आणि त्यांचे मत मांडत आहेत.

https://www.instagram.com/p/B_cB951F0JQ/?igshid=1vgksv5th8w52

Find Out More:

Related Articles: