काँग्रेस आणखी एका मोठ्या संकटात

     लोकसभा निवडणुकीत दारूण पराभवातून काँग्रेस अजून पूर्णपणे सावरलेलीही नाहीये, असं असताना तेलंगणामध्ये 18 पैकी 12 आमदारांनी तिथल्या विधानसभेच्या अध्यक्षांची भेट घेतली आहे. आपल्या गटाला तेलंगाणा राष्ट्र समिती या पक्षामध्ये विलीन होण्यास मंजुरी द्यावी अशी मागणी या आमदारांनी केली आहे.


     2018 साली तेलंगाणामध्ये निवडणुका झाल्या होत्या. इथे एकूण 120 आमदार असून यातील 88 आमदार हे तेलंगाणा राष्ट्र समितीचे आहेत. काँग्रेसचे एकूण 18 आमदार असून तेच तिथले मुख्य विरोधी पक्ष आहेत. 18 मधले 12 आमदार गेले तर काँग्रेसचे फक्त 6 आमदार उरतील.


     राष्ट्रीय काँग्रेसमध्ये लोकसभा निवडणुकीतील सुमार कामगिरीमुळे खळबळ उडाली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा देऊ केला होता. सध्या त्यांनी बाळगलेल्या मौनामुळे आपला हा निर्णय त्यांनी बदलला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे अनेक काँग्रेस नेत्यांनी त्यांचे राजीनामे देऊ केले आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या काँग्रेसचे दिग्गज नेते पक्ष सोडून जायला लागले आहेत. 8-10 काँग्रेस आमदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता असल्याचे काँग्रेसमधून निलंबित आमदार अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. तेलंगाणा काँग्रेसमध्येही फारशी वेगळी परिस्थिती नाहीये. सत्ता मिळण्याची अजिबात शक्यता दिसल्याने तिथल्या आमदारांनी सत्ताधारी पक्षाशी हातमिळवणी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. विधानसभा अध्यक्षांनी या गटाला विलयासाठी परवानगी दिली तर काँग्रेसची चिंता आणखी वाढणार आहे.

@सामना

Find Out More:

Related Articles: