अॅड. प्रकाश आंबेडकरांकडून ब्रम्हनाळ गाव दत्तक
दरम्यान, महापुराचा सर्वाधिक फटका बसलेले सांगलीच्या पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ हे गाव वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दत्तक घेतले आहे. या संपूर्ण गावाचे ते पुनर्वसन करणार आहेत. ब्रह्मनाळमध्ये बोट उलटून 17 जणांचा जीव गेला होता.
या गावात साडे तीन हजार लोक राहतात. सातशे कुटुंबांच्या या गावाचे आंबेडकर पुनर्वसन करणार आहेत. अॅड. आंबेडकर यांनी हे गाव दत्तक घेतल्याचे कळताच गावचे संरपंच व गावकर्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
असे होणार पुनर्वसन।
- गावामध्ये स्वच्छता आणि औषध फवारणी, आरोग्य तपासणी व औषधोपचार
- 700 कुटुंबाना पुढील एक महिना पुरेल एवढे धान्य देणार
- विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्याचे वाटप
- गावात वॉटर एटीएम लावण्यात येणार।
- गावकर्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी मानसोपचार व वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रम