पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत गायराण जमिनीचा विचार – सदाभाऊ खोत

कोल्हापूर : ग्रामीण भागातील गावगाड्याला डोळ्यासमोर ठेवून शासन निर्णय घेत आहे. पुर ओसरु लागला आहे. पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत शासन गायराण जमिनीचा विचार करत आहे. जनावरांची नुकसान भरपाई म्हणून 30 हजार रुपये देण्यात येत आहेत. पूरग्रस्तांना रोख 5 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदानही वाटप करण्यात येत आहे, असे कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

शिरोळ तालुक्‍यातील टाकळीवाडी येथील गुरुदत्त शुगर्स कारखान्यावरील पूरग्रस्तांच्या शिबीराला कृषीराज्यमंत्री खोत यांनी आज भेट दिली. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष माधवराव घाटगे, जयसिंगपूर नगराध्यक्ष डॉ. निता माने उपस्थित होते.खोत म्हणाले, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत देण्यात येणार आहे. या परिस्थितीत प्रशासनाने प्रचंड काम केले आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गुरुदत्त शुगर्सने तसेच जनावरांसाठी शिबीर सुरु केल्याबद्दल त्यांनी अध्यक्ष माधवराव घाटगे यांचे अभिनंदन केले.

पाणी पुरवठा योजना सुरळीत करण्यासाठी त्यांच्या दुरुस्तीचा खर्च शासन देणार आहे. माणसाला धीर देणं, उभं करणे महत्वाचे आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील गावगाडा डोळ्यासमोर ठेवून शासन निर्णय घेत आहे. संक्रमण शिबीरातून जातानाही पुढील सात दिवस पुरेल इतकी शिधा सामुग्रीही देण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.                                                                    


Find Out More:

Related Articles: