दमानियांची राज ठाकरेंवर बोलण्याची लायकी नाही, मनसे सरचिटणीस गुप्तांची खरमरीत टीका

frame दमानियांची राज ठाकरेंवर बोलण्याची लायकी नाही, मनसे सरचिटणीस गुप्तांची खरमरीत टीका

कोहिनूर स्क्वेअर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. गेले 5 तास राज ठाकरे यांची बंद दाराआड ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी सुरु आहे. तर बाहेर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज ठाकरे यांच्यावर उपहासात्मक ट्विट करून मनसे समर्थकांचा रोष ओढून घेतला आहे. दमानिया यांच्या या ट्विटचा मनसेच्या सरचिटणीस रिटा गुप्ता यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

‘तुझ समाजिक कार्य घरी कराव. आम्हाला शहाणपणा शिकवू नका. तुझी राज ठाकरेंवर बोलण्याची लायकी ही नाही आणि कुवत देखील नाही आहे, असे म्हणत रिटा गुप्ता यांनी अंजली दमानिया यांची लायकी काढली आहे. राज ठाकरे आज ईडीच्या चौकशीला जाताना त्यांच्या बरोबर त्यांचे कुटुंब देखील होते. यावरून अंजली दमानिया यांनी राज ठाकरे यांची खिल्ली उडवणारे वादग्रस्त ट्विट शेअर केले. राज ठाकरे चौकशीला जात आहेत की, सत्यनारायणाच्या पूजेला, असे ट्विट करत त्यांची खिल्ली उडवली.

दरम्यान राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार ईडीच्या चौकशीला निघालेत का सत्यनारायणाच्या पूजेला?, बायको, मुलगा, सून, मुलगी आणि बहीण? सगळे मिळून माहिती देणार का? काय हा ड्रामा? का सहनुभी गोळा करण्याचा हा प्रयत्न, असे ट्विट दमानिया यांनी केले आहे.                                         

Find Out More:

Related Articles:

Unable to Load More