अतिउत्साही कार्यकर्त्यांने घेतलं राहुल गांधींच चुंबन
केरळमधील पूरग्रस्तांच्या आढावा घेण्यासाठी वायनाड येथे आपल्या मतदारसंघात पोहोचलेले कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागला.वाडनाड दौऱ्यावरुन निघताना राहुल गांधी यांचे एका अतिउत्साही कार्यकर्त्याने त्यांचं चुंबन घेतले. अचानक घडलेल्या या प्रकाराने स्वतः राहुल गांधींही चकीत झाले. हा सर्व प्रसंग कॅमेरात कैद झाला. याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.
ग्रे रंगाच्या टी-शर्टमध्ये असलेले राहुल गांधी गाडीच्या पॅसेंजर सीटवर बसून लोकांना हात मिळवून अभिवादन करत होते. दरम्यान निळ्या शर्टमधील एका व्यक्तीने आधी राहुल गांधींसोबत हात मिळवला. यानंतर त्याने अतिउत्साहात काही कळायच्या आत त्यांच्या गालावर चुंबन घेतले. या घटनेनंतर एकाने चुंबन घेणाऱ्याला मागे ओढले. तर या प्रसंगामुळे राहुल गांधीही काहीसे गोंधळले होते. मात्र यानंतरही ते लोकांना कारमधून हात मिळवत अभिवादन करत राहिले.
दरम्यान एसपीजी’ म्हणजे (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) राहुल गांधी यांची सुरक्षा करते. अशाप्रकारे, त्यांच्याकडे मुलाच्या प्रवेशामुळे सुरक्षिततेवर देखील प्रश्न निर्माण झाले आहेत .राहुल गांधी हे मंगळवारी पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी वायनाडला गेले होते. वायनाड येथील सेंट थॉमस चर्चमधील मदत शिबिरात, त्यांना पीडितांच्या तब्येतीची माहिती यावेळी घेतली.