साताऱ्यातील राजकीय समीकरण बदलली, उदयनराजेंच्या निर्णयावर ठरणार रामराजेंचा पक्ष
विधानसभा निवडणुकीत सातार जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलताना दिसत आहेत. कारण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन्ही मातब्बर नेते भाजप – शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे सातार जिल्ह्यात ही राष्ट्रवादी कॉंग्रेसची अवस्था बिकट झाली असल्याच दिसत आहे. सातारचे खा. उदयनराजे भोसले हे भाजपच्या वाटेवर आहेत. तर आ. रामराजे नाईक निंबाळकर हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत. हे दोन्ही नेते भाजप आणि सेनावासी होणार असल्याने सातार जिल्ह्यातही राष्ट्रवादीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
रामराजे नाईक निंबाळकर हे देखील भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र उदयनराजे भोसले हे भाजपच्या वाटेवर असल्याने रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपला पक्षांतराचा निर्णय थांबवला आहे. कारण राष्ट्रवादीचे खा. उदयनराजे यांच्या पक्षप्रवेशाचा अंतिम निर्णय झाल्यावरच ते आपला निर्णय जाहीर करणार आहेत. याला कारण म्हणजे राजराजे आणि उदयनराजे यांच्यातील वाद असल्याचं सांगितल जात आहे.
तसेच रामराजे नाईक निंबाळकर हे शिवसेनेच्या संपर्कात आहेत. रामराजे हे विधानपरिषदेचे सभापती आहेत. त्याआधी फलटणमधून निवडणूक जिंकले आहेत. युतीमध्ये फलटण विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या खात्यात आहे. त्यामुळे रामराजे शिवसेनेत जाणार असल्यची शक्यता वर्तवली जात आहे. रामराजे आणि उदयनराजे यांचा वाद हा सर्वश्रुत आहे. त्यामुळे उदयनराजे यांच्या निर्णयावर रामराजे यांच्या पक्षांतराचा निर्णय अवलंबून असणार आहे.