मुख्यमंत्र्यांनी राजकारण सोडून ज्योतिषाचे काम करावे, पृथ्वीराज चव्हाणांचा खोचक टोला

Thote Shubham

राज्यात विरोधी पक्ष असेल तर तो ‘वंचित आघाडीचा’ असेल असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. तर देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याचा कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी चांगलाचं समाचार घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी आता राजकारण सोडून ज्योतिषाचे काम करावे असा खोचक सल्ला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला आहे.

पुण्यातील पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, देशभरात जे विरोधक भाजपात येणार नाही त्यांच्याविरोधात चौकशी लावली जाते आहे. तर चौकशी लावू अशी धमकीही त्यांना दिली जाते आहे. फक्त राष्ट्रवादीच्याच नेत्यांना नाही तर काँग्रेसच्या नेत्यांनाही अशाचप्रकारे धमक्या देऊन भाजपात घेतले जाते आहे.

तसेच आघाडी सरकारच्या काळात देखील किरकोळ घोटाळे होत होते. त्यावेळी घोटाळेबाजावर कारवाई केली. पण यांच्या कार्यकाळात तर लाखो कोटी रूपयांचा घोटाळा झाला आहे. तसेच अनेक भागांत घोटाळ्यांची प्रकरणं पुढे येत आहे. तरीही कारवाई केली जात नाही, असे चव्हाण म्हणाले.

दरम्यान पुढच्या विधानसभेत विरोधी पक्ष किंवा विरोधी पक्षनेता हा वंचित बहुजन आघाडीचा असेल. हे पद काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार नाही असे भाकीत फडणवीस यांनी केले आहे. यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीसांना सुनावले आहे. लोकसभा निवडणुकापासून प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला मुख्यमंत्र्यासह भाजपाचा छुपा पाठिंबा होताच. आता विधानसभा निवडणुकीत ही असेल. त्यामुळे आता फडणवीस यांनी ज्योतिषाचे काम करावे, असा सल्ला चव्हाण यांनी दिला आहे.

Find Out More:

Related Articles: