सुपा येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे रास्ता रोको

Thote Shubham

दोन कोटी युवकांना नोकऱ्या देऊ असे सांगून सत्तेवर आलेले हे सरकार युवकांच्या नोकऱ्या काढून घेत आहे. पण तरुणांचे माथे सटकल्यावर मुख्यमंत्र्यांसह तुमच्या पक्षाच्या आमदारांना या निवडणुकीमध्ये बेरोजगार केल्याशिवाय हे तरुण शांत बसणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई शेख यांनी केले.

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वाढत्या बेरोजगारी विरोधात जन आक्रोश आंदोलन नगर- पुणे महामार्गावरील सुपा येथे करण्यात आले. यावेळी सुपा येथे करण्यात आलेल्या रास्ता रोको प्रसंगी शेख बोलत होते. यावेळी सुमारे पावून तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यादरम्यान वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या.

पारनेरचे नायब तहसीलदार यांना निवेदन देऊन रास्ता रोको मागे घेण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते घनश्‍याम शेलार, युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, निलेश लंके, बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, अशोक सावंत, उपसभापती दीपक पवार, युवकचे तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर, सुदाम पवार, बापू शिर्के, विजय औटी, दादा शिंदे, संदीप मगर, दौलत गांगड आदींसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.                                                                                  


Find Out More:

Related Articles: