बिल ऍण्ड मेलिंडा गेट्‌स फाऊंडेशनकडून मोदींचा गौरव

Thote Shubham

सार्वजनिक स्वच्छतेच्या हेतूने देशभरात “स्वच्छ भारत अभियान’ सुरु करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या योगदानासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा गौरव केला जाणार आहे.

बिल ऍण्ड मेलिंडा गेट्‌स फाऊंडेशनकडून त्यांचा गौरव केला जाणार असल्याची माहिती सोमवारी पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आपल्या ट्‌विटर अकाऊंटद्वारे ही माहिती दिली आहे.

त्यांनी आपल्या ट्‌विटमध्ये म्हटले की, आणखी एक पुरस्कार, प्रत्येक भारतीयासाठी गौरवाचा आणखी एक क्षण. कारण, पतंप्रधान मोदींची मेहनत आणि प्रगतीशील धोरणाची जगभरात प्रशंसा केली जात आहे.

ऑक्‍टोबर महिन्यात अमेरिका दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांचा बिल ऍण्ड मेलिंडा गेट्‌स फाऊंडेशनकडून गौरव केला जाणार आहे. यापूर्वी सहा मुस्लिम राष्ट्रांनी आणि रशियाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना गौरविले आहे.

ऑक्‍टोबर 2018 मध्ये मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्‌स यांनी “स्वच्छ भारत अभियाना’साठी पंतप्रधानांचे कौतुक केले होते. स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून देशात 8 कोटींहून अधिक स्वच्छतागृहांची निर्मिती करण्यात आली आहे.

यामुळे देशात पाच लाख गावे ही हागणदारीमुक्त झाली असल्याचे सरकारी आकडेवारीवरुन कळते. तसेच मोदींना यापुर्वी सहा मुस्लिम राष्ट्रांनी आणि रशियाने आपल्या सर्वोच्च पुरस्काराने गौरविले आहे.                                                       


Find Out More:

Related Articles: