घरकुल घोटाळा : गुलाबराव देवकर यांना ५ वर्षांची शिक्षा तर सुरेश जैन यांना ७ वर्षांची शिक्षा, दोघांचीही कारागृहात रवानगी

Thote Shubham

राज्यभर गाजलेल्या जळगाव नगरपालिकेतील घरकुल घोटाळ्यात ४८ जणांना दोषी ठरवण्यात आले होते. यात गुलाबराव देवकर यांना ५ वर्षांची शिक्षा तर सुरेश जैन यांना ७ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सोबतच सुरेश जैन यांना सात वर्षांची शिक्षा आणि १०० कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांनाही ५ वर्षांची शिक्षा आणि ५ लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे.

शिक्षा सुनावल्यानंतर आता माजी मंत्री सुरेश जैन आणि गुलाबराव देवकर यांच्यासह ३८ आरोपींची नाशिकच्या कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. तसेच उर्वरित १० आरोपी हे सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर त्यांच्यावर प्रत्यक्ष कारवाई कधी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते आणि आता जैन आणि देवकर यांना अटक झाली आहे.

जळगाव नगरपालिकेतील सत्ताधारी गटाने झोपडपट्टी निर्मूलनाच्या उद्देशाने स्वस्त दरात चांगली घरे देण्यासाठी घरकुल योजना राबवण्याचे ठरवले होते. घरकुल बांधण्यासाठी ‘हुडको’कडून कोट्यवधींचं कर्ज घेण्यात आलं होते.हरी विठ्ठलनगर, खंडेरावनगर, समतानगर आणि तांबापुरा याठिकाणी सुमारे ११० कर्ज काढून ११ हजार घरे बांधण्याच्या कामास १९९९ मध्ये सुरुवात झाली.

सुरुवातीपासूनच अनियमितता, कायद्याचे उल्लंघन, मनमानी पद्धतीने निर्णय, गैरव्यवहार या सर्वांचा ससेमिरा मागे लागला. सत्ताधाऱ्यांनी मर्जीतील खान्देश बिल्डर्सला हे काम दिलं. नियमबाह्य पद्धतीने ठेकेदाराला सुमारे २६ कोटी रुपये बिनव्याजी आगाऊ देण्यात आले. इतकेच नव्हे, तर ठेकेदारास विविध सुविधाही देण्यात आल्या होत्या. हा सगळा प्रकार २००१ मध्ये समोर आला होता.

Find Out More:

Related Articles: