विद्यमान आमदारांना मिळणार पुन्हा संधी, कॉंग्रेसची पहिली यादी मंगळवारी जाहीर होण्याची शक्यता

frame विद्यमान आमदारांना मिळणार पुन्हा संधी, कॉंग्रेसची पहिली यादी मंगळवारी जाहीर होण्याची शक्यता

Thote Shubham

 आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची आपल्या उमेदवारांसाठी चाचपणी सुरू आहे. कॉंग्रेस येत्या 10 सप्टेंबरला आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार असल्याची शक्‍यता आहे. यामध्ये एकूण 60 उमेदवारांचा समावेश असणार आहे, अशी शक्‍यता वर्तवली जात आहे.

कॉंग्रेसकडून 30 विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्‍यता आहे. तर मागील निवडणुकीत पराभव झालेल्या दिग्गजांनाही संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीनेही आपले 70 उमेदवार निश्‍चित केल्याचे समोर येत आहे. काल पुण्यात शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही नावे निश्‍चित झाल्याचे समजत आहे.

दरम्यान, युतीच्या जागावाटपाची प्राथमिक चर्चा पार पडली असून पुढील आठवड्यात उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे कार्याध्यक्ष जेपी नड्डा यांच्यात युतीच्या फॉर्म्युल्याबाबत बैठक पार पडणार आहे. मात्र युतीच्या फॉर्म्युल्याचा अंतिम निर्णय अमित शहा घेणार असल्याचे बोलले जात आहे.                                                                                                                                   

Find Out More:

Related Articles:

Unable to Load More