आढळरावांनी जनतेकडून मिळालेल्या सक्तीच्या निवृत्तीचा आनंद घ्यावा व राजकारणातून निवृत्त व्हावे : अमोल कोल्हे

frame आढळरावांनी जनतेकडून मिळालेल्या सक्तीच्या निवृत्तीचा आनंद घ्यावा व राजकारणातून निवृत्त व्हावे : अमोल कोल्हे

Thote Shubham

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून ही यात्रा सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. ही यात्रा चंद्रपुर येथे आली असता या यात्रेला राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी संबोधित केले होते.

यावेळी अमोल कोल्हे यांनी शिरूरचे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. कोल्हे म्हणाले की पराभवाच्या नैराश्यातून आढळराव बोलत आहेत. परंतु, त्यांनी जनतेकडून मिळालेल्या सक्तीच्या निवृत्तीचा आनंद घ्यावा.

आढळरावांनी आता राजकारणातून निवृत्त व्हावे, असा अप्रत्यक्ष सल्लाच कोल्हे यांनी दिला. आता कोल्हे यांच्या टीकेला आढळराव पुन्हा काय प्रत्युत्तर देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

दरम्यान भोसरी येथे बोलताना आढळराव यांनी मतदार संघातील तीन महिन्यांच्या कामगिरीनंतर डॉ. कोल्हे यांच्यावर कडाडून टीका केली होती. जातीचं राजकारण करून विजय मिळविणाऱ्या डॉ. कोल्हेंना निवडून दिल्याचा जनतेला पश्चाताप होत असल्याचे आढळराव म्हणाले होते.

तसेच शिवस्वराज्य यात्रेनंतर राष्ट्रवादी पक्ष संपुष्टात येईल, अशी टीका आढळरावांनी केली होती. याला डॉ. कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्रपूर येथे पोहोचलेल्या शिवस्वराज्य यात्रेतून प्रत्युत्तर दिले.                                                                                                   


Find Out More:

Related Articles:

Unable to Load More